Saturday , February 23 2019
Breaking News

विजेच्या धक्याने चिमुकलीचा मृत्यू

रावेत : घरातील पाणी तापविण्याच्या हिटरला हात लावताच विजेच्या धक्क्याने चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. ही घटना रावेत येथे मंगळवारी (दि. 4) दुपारी पावणेचार वाजता घडली. दिव्या कैलास गराड (वय 4, रा.रावेत) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास गराड हे मजुरीचे काम करतात. तर त्यांच्या पत्नी या गृहिणी आहेत. गराड कुटुंबीय हे शिंदेवाडी येथे भाड्याच्या घरात रहात होते. मंगळवारी ते राहते घर बदलत होते. त्यामुळे घरात सर्वत्र सामान पसरलेले होते. सामान हलवण्याच्या घाईत घरातील पाणी तापवायचे हिटर चालूच राहीले होते. यावेळी दिव्या तेथे खेळत-खेळत आली व तीने हिटरला हात लावला. त्यामुळे तिला जोराचा झटका बसला व ती जागीच बेशुद्ध झाली. पालकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ तिला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टीरांनी तिला मृत घोषित केले.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

निवडणुकीपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांची उचलबांगडी होणार?

मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठविल्याचे खात्रिलायक वृत्त पंतप्रधानांच्या चोरुन चित्रीकरणाचा ठपका ठेवल्याचीही चर्चा कर्मचार्‍यांमध्ये दिवसभर गुर्‍हाळ  जळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!