विद्यापीठाचा महत्वाचा निर्णय; सीएम सहायता निधीत योगदान

0

जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या उद्भवलेल्या संकटावर मात करण्यासाठी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जाहीर केले असून १० लाख ९१ हजार रूपयांचा हा निधी लवकरच दिला जाणार आहे.

विद्यापीठाने सर्व संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्य व परिसंस्थांच्या संचालकांना देखील पत्र पाठवून महाविद्यालयांतील शिक्षक व कर्मचारी यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचे आवाहन केले आहे. मंगळवारी हे पत्र पाठविण्यात आले आहे.