विद्यापीठाच्या परीक्षांबाबत निवेदन

0

पुणे : राज्यात लोकसभा निवडणुका चार टप्प्यांत होत असून, त्याच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. मतदानाच्या दिवशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार आहेत.

पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील मतदान 23 व 29 तारखेला असल्याने पुढील दिवसांमध्ये असलेल्या पेपरच्या तारखा बदलण्यात येणार आहेत.दिनांक 22 ते 24 एप्रिल आणि 28 ते 30 एप्रिल या दिवसांमध्ये असलेले पेपर कधी घेण्यात येणार आहेत, याबाबत सविस्तर वेळापत्रक 8 ते 10 दिवसांमध्ये विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल, असे निवेदन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे.