विधानपरिषदेवर महाविकास आघाडीचा पहिला उमेदवार बिनविरोध !

0

मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेत अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला वापरला जातो आहे. दरम्यान सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे विधान सभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवर महाविकास आघाडीच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे. बीडचे जिल्हा परिषद सदस्य संजय दौंड यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपच्या उमेदवाराने माघार घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली आहे.

महाविकास आघाडीने एकत्रित संजय दौंड यांना उमेदवारी दिली होती. भाजपने उमेदवार दिला मात्र माघार घेतली. महाविकास आघाडीचा हा पहिलाच एकत्रित विजय मानला जात आहे.