विधी व न्याय खात्याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी आदिती तटकरेंकडे !

6

मुंबई: विधी व न्याय खात्याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी कु.आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत आज रविवारी आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांकडील माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय या दोन महत्वाच्या खात्याचे राज्यमंत्रीपद कु. तटकरे यांच्याकडे देण्यात आल्याने आता त्यांच्याकडे राज्यामंत्रीपदाच्या एकूण आठ विभागाचा पदभार आला आहे. मंत्रिमंडळातील युवा मंत्री म्हणून कु.तटकरे यांच्याकडे पाहिले जाते.