विनयभंगाच्या खटल्यातून फैजपूरच्या प्राध्यापकाची निर्दोष मुक्तता

0

भुसावळ : यावल तालुक्यातील फैजपूर येथील प्रा.डॉ.शरदचंद्र फकीरा कोल्हे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा खटला दाखल झाला होता मात्र त्यांच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध न झाल्याने यावल न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता मंगळवारी केली. प्रा.कोल्हे यांनी 10 एप्रिल 2018 या दिवशी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांच्या घरी आलेल्या महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप होता शिवाय याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल होता. या प्रकरणात संशयीत प्रा.कोल्हे यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. यावल न्यायालयात खटल्याचे कामकाज चालले. यात पाच साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. गुन्हा सिद्ध न झाल्याने यावल न्यायालयाचे न्या.जगताप यांनी त्यांना मंगळवारी निर्दोष मुक्त केले. त्यांच्यातर्फे अ‍ॅड.प्रफुल पाटील तसेच अ‍ॅड.निवृत्ती पाटील यांनी कामकाज पाहिले.