विनयभंग प्रकरण ; रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशींसह चौघे पोलिसांना शरण

0

संशयीत आरोपींना न्यायालयाने सुनावली न्यायालयीन कोठडी

भुसावळ- रीपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्यासह सात जणांनी महिलेला शिवीगाळ करीत विनयभंग केल्या प्रकरणी येथील 3 फेब्रुवारी 2019 बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याील संशयीत आरोपी राजू सूर्यवंशीसह कैलास सूर्यवंशी, आनंद सूर्यवंशी व संकेत डोंगरे हे मंगळवारी बाजारपेठ पोलिसांना शरण आल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. वरणगाव रोडवरील लाल मंदीराजवळ रविवार, 3 फेब्रुवारी दुपारी 4.15 वाजेच्या सुमारास तक्रारदार महिला घराच्या बाहेर बसली असतांना राजू भागवत सूर्यवंशी यांच्यासह सात संशयीतांनी महिलेला अश्लिल शिवीगाळ करीत पती व सासूला शिव्या दिल्या होत्या. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीनुसार बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज ठाकरे करीत आहेत.