विनाकारण फिरणाऱ्यांना लागणार ब्रेक: पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त

0

नंदुरबार: लॉकडाऊन असतांना विनाकारण मोटारसायकलवर बाजारात फिरणाऱ्या लोकांना आता ब्रेक लागणार आहे, त्यासाठी शहरातील सुभाष चौक,मंगळ बाजार,तूप बाजार आदी वर्दळीच्या ठिकाणी प्रशासनाने ब्यारॅकेट लावले आहेत,त्यामुळे या भागात आता कोणत्याही मोटार सायकल स्वाराला जाता येणार नाही, भाजीपाला खरेदीच्या नावाने किंवा अन्य कारणाने रस्त्यावर मुद्दाम फिरतांना आढळून आल्यास अशा वाहनधारक कारवाई केली जाणार आहे,कोरोना संकट टाळण्यासाठी प्रशासन विविध प्रकारच्या उपाययोजना करून कोरोना मुक्त नंदुरबार करण्याचा प्रयत्न प्रशासन करत असतांना शहरातील काही नागरिक बिनधास्तपणे मुक्तसंचार करतांना आढळून येत आहेत, त्यामुळे आता कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,