विमानतळावर 28 लाखांचे परदेशी चलन जप्त

0 1

पुणे : कस्टम विभागाच्या अधिकार्‍यांनी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन प्रवाशांकडून 28 लाख रुपयांचे अमेरिकन चलन जप्त केले आहे. मोहन पाटील आणि सचिन पाटील या दोन प्रवाशांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. त्यांच्या बॅग झडतीत हे चलन मिळून आले.

सदर परदेशी चलन हे एअर इंडियाच्या विमानाने तस्करी करून संबंधित प्रवासी घेऊन आले होते. त्यांच्याकडून 41 हजार 422 अमेरिकन डॉलर म्हणजे भारतीय चलनातील 28 लाख रुपये जप्त करण्यात आले. कस्टम अ‍ॅक्ट 1962 आणि फेमा अ‍ॅक्ट 2000 नुसार संबंधित चलन तस्करी करण्यास वापरल्याने जप्त करण्यात आले आहे. कस्टम अ‍ॅक्ट 1962 च्या सेक्शन 108 नुसार सदर दोघांचे जबाब नोंदवण्यात आले असून याप्रकरणी त्यांची पुढील चौकशी करण्यात येत आहे.