विरोधकांना सुप्रीम कोर्टाकडून धक्का; सीएएला स्थगिती देण्यास नकार !

0

नवी दिल्ली: केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व कायद्याला देशभरात विरोध होत आहे. मात्र केंद्र सरकार कोणत्याही परिस्थितीत हा कायदा रद्द करणार नसल्याचे सांगत आहे. दरम्यान देशात लागू करण्यात आलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने ‘सीएए’ला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. या सर्व याचिकांवर चार आठवड्यानंतर पुन्हा सुनावणी होणार आहे.