विवर्‍याच्या विवाहितेचा गळफास घेवून मृत्यू

0

रावेर- तालुक्यातील विवरे येथील रेणुका मुकेश सपकाळ (23, रा.विवरे बु.॥) या विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना 28 रोजी दुपारी 12.30 वाजेपूर्वी राहत्या घरी घडली. निंभोरा पोलिसात या प्रकरणी पंकज पुंडलिक सपकाळ (38) यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे, स्वप्नील पाटील करीत आहेत.