भुसावळात दगडफेक करणार्‍या तिघांना अटक

0

भुसावळ : शहरात बुधवार, 29 जानेवारी रोजी बहुजन क्रांती मोर्चा आणि बामसेफ संघटनेतर्फे सीएए व एनआरसी विरोधात भारत बंदची हाक देण्यात आली होती मात्र त्याचवेळी संतप्त जमाव बाजारपेठ बंद करण्यासाठी निघाल्यानंतर जमावाने बाजारपेठ पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी दोनशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी या गुन्ह्यात आठ संशयीतांना अटक करण्यात आली होती तर मंगळवारी पुन्हा या गुन्ह्यात शाहरूख खान, शेख सलमान व शेख रहिम यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.