विवाहितेस ‘लिव्ह इन’ मध्ये राहण्यासाठी धमकी

0

पिंपरी चिंचवड ः विवाहित महिलेला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची मागणी करत धमकी दिली. तसेच महिलेशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. याबाबत महिलेने पोलिसात गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 3) रात्री सात ते मंगळवारी (दि. 4) पहाटे साडेबारा या कालावधीत आदित्य बिर्ला रुग्णालयासमोर आणि महिलेच्या घरी घडला. स्वप्नील बांदल (रा. सेनापती बापट रोड, औंध) असे गुन्हा दाखल झाल्याचे नाव आहे. याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वप्नील याने फिर्यादी महिलेचा वेळोवेळी पाठलाग केला. थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयासमोरील बस स्टॉपवर तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. ‘तू मला हवी आहेस, आपण असेच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू’ असे स्वप्नील म्हणाला. यासाठी फिर्यादी महिलेने नकार दिला असता त्यानंतर स्वप्नील याने महिलेशी गैरवर्तन करून तिच्या घरी जाऊन धमकी दिली. याबाबत महिलेने पोलिसात धाव घेऊन गुन्हा नोंदवला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.