विश्वासघाताने आलेल्या सरकारकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात: देवेंद्र फडणवीस

0

नागपूर: काल शनिवारी हिवाळी अधिवेशानाच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर भाजपने सभागृहाचा त्याग करत सरकारवर आरोप केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा सरकारवर हल्लाबोल केला आहे. विश्वासघाताने सत्तेत आलेल्या सरकारने शेतकऱ्यांचा देखील विश्वासघात केला आहे असे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्याचे आश्वासन सत्तेत येण्यापूर्वी दिले होते, ते झालेच नाही असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तिघाडी सरकारने दिलेली कर्जमाफी ही उधारी कर्जमाफी आहे असे आरोपही फडणवीस यांनी केली.