विश्‍वासात घेतल्याशिवाय विमा योजना लागू करु नका ः अध्यक्ष अंबर चिंचवडे

0

महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना कर्मचारी महासंघाचे पत्र

पिंपरी ः पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचार्‍यांना धन्वंतरी योजना सोयीस्कर वाटत आहे. त्यामुळे कर्मचारी महासंघाला अगोदर विमा योजनेची सविस्तर माहिती द्यावी, त्यामुळे सर्व कर्मचारी व अधिकार्‍यांना विश्‍वासात घेतल्याशिवाय विमा योजना लागू करण्यात येवू नये, अशी मागणी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अधिकारी-कर्मचार्‍यांच्या आरोग्यासाठी धन्वंतरी स्वास्थ योजना कार्यान्वित आहे. सदरील योजना बंद करुन वैद्यकीय विभागाने विमा योजना सुरु करण्यात येवू लागली आहे. सध्या सुरु असलेल्या धन्वंतरी योजनेतील त्रूटी दूर करुन नव्याने सुधारित धन्वंतरी योजना चालू ठेवणे महापालिकेच्या आर्थिक व कर्मचार्‍याच्या सोयीसाठी आवश्यक आहे. दरम्यान, कर्मचारी महासंघाच्या पदाधिकांर्‍यासोबत 13 जानेवारी 2020 रोजी झालेल्या चर्चेत आपण नव्याने कार्यान्वित होणा-या विमा योजनेबाबत कर्मचारी व अधिका-यांना सविस्तर माहिती देण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे कर्मचारी महासंघाला विश्‍वासात घेतल्याशिवाय कर्मचार्‍यांना विमा योजना लागू करु नये, अशी मागणी चिंचवडे यांनी केली आहे.