वीज कंपनी कर्मचार्‍याला अंजाळेत मारहाण

0

यावल- फ्यूज टाकण्यात उशिरा का आला म्हणून एकाने वीज कंपनीच्या वायरमनलाच मारहाण करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना तालुक्यातील अंजाळेत मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी राजोरा कक्षाचे वायरमन भूषण भोजू भालेराव यांच्या फिर्यादीनुसार दत्तू कृष्णा कोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार हे राजोरा येथे असताना त्यांना अंजाळे गावातून विद्युत पुरवठा खंडित झाल्याचा दूरध्वनी आल्यानंतर ते सकाळी साडेआठ वाजता अंजाळेत पोहोचले. बस स्थानकाजवळ असलेल्या रोहित्राजवळ ते पाहणी करत असताना रोहित्रामधील सहा फ्यूज कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काढून टाकल्याचे दिसून आले. यावेळी भालेराव इतक्या उशिरा का आला? लवकर वीजपुरवठा सुरू करा असे सांगत आरोपीन शिवीगाळ करून धक्काबुक्की करीत मारहाण केली. तपास पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, हवालदार संजय तायडे करीत आहे.