पुणे । पंढरपूर यात्रेतील वारकर्यांसाठी विविध प्रकारची आरोग्यसेवा देण्याचे कार्य करीत असलेल्या वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्टच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त वारकर्यांच्या सेवेसाठी ‘खरा वैष्णव’ या विशेषांकास जाहिरात, देणगी, औषधे, साहित्य रुपाने मदत करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. वारीतील या आरोग्यसेवेबरोबरच ट्रस्टतर्फे वर्षभर ग्रामीण व आदिवासी भागातही आरोग्य शिबिरे घेतली जातात. गेल्या 25 वर्षात लाखो रुपयांपेक्षा जास्त औषधांचे वितरण करून पंचवीस लाख रुग्णांची आरोग्य सेवा केली आहे.
आषाढी वारी 2018 तसेच ट्रस्टच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मोफत वैद्यकीय सेवा यापुढेही अखंडपणे सुरू राहावी, यासाठी ट्रस्टला लोकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. 10 जुलै रोजी सकाळी 10 वाजता वैद्यकीय पथक प्रस्थान कार्यक्रमाचे निगडी येथील अ प्रभाग कार्यालयामागच्या जलाराम चौकातील वासू रेस्टॉरंट येथे करण्यात आले आहे. नागरिकांनी मदत करण्यासाठी सारस्वत को-ऑफ बँक लि. विणानगर, मुलुंड (प) या शाखेच्या (बचत खाते क्रमांक 159200100022743, आयएफएससी क्रमांक एसआरसीबी0000159, संस्थेचा पॅन क्रमांक एएएटीव्ही 2504 एल) यावर रक्कम भरण्याचे आवाहन वारी प्रमुख देहू ते पंढरपूर वारी नियोजन समितीचे अध्यक्ष मुकेश सोमैय्या (9822751761, ट्रस्टचे विश्वस्त श्रीराम नलावडे (9765708642), कार्याध्यक्ष प्रकाश सातव (8275262577) तसेच सल्लागार दादासाहेब काळे (9822902185) यांनी केले आहे.