[व्हिडीओ] ‘कोरोना साई प्रार्थनेद्वारे’ रामानंद नगर पोलीस निरीक्षकांची नागरिक‍ांना भावनिक साद

1

अनिल बडगुजर यांनी स्वतःच लिहले अन् गायक म्हणुनही म्हटले

जळगाव (किशोर पाटील) : कोरोणाने जगभरात थैमान घातलेले आहे. नागरिकांनी बाहेर न निघणे, गर्दी न करणे हा एकच कोरोपासून वाचण्याचा हमखास उपाय आहे. शासनाकडूनही याबाबत विविध माध्यमांद्वारे जनजागृती केली जात आहे. अशा प्रकारे पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी कोरोना साई प्रार्थनेतुन नागरिकांना सुरक्षितते करिता भावनिक साद घातली आहे .

अशी सुचली संकल्पना

लॉक डाऊन असल्याने सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात आहे यादरम्यान पोलिसांसाठी विशेष खबरदारी तसेच जनजागृती करण्याच पोलीस अधीक्षकांकडून प्रभारी अधिकाऱ्यांना तसेच सूचना व मार्गदर्शन केले जात आहे. अशाच पद्धतीने कर्तव्य बजावत असतांना रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांना गीताची संकल्पना सुचली. मग काय आधीच कवी असलेल्या बडगुजर यांनी स्वतःच गाण लिहले. साईभक्त असलेल्या बडगुजर यांनी मेरे दर के अागे साईनाथ या गीताला अनुसरूनच संगीतबद्ध केलं. तसेच कोरोणाला हरविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे व परमेश्वराने त्याला बळ द्याव म्हणून लिहिलेल्या गीताला कोरोना साई प्रार्थना असं नाव दिलं.

पोलीस निरीक्षकांचा खाकीतील दर्दी आवाज लोकांसमोर

सरगम आर्केस्ट्राच्या सलमान शहा यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं. तर डिलाइट स्टुडिओच्या मनोज पाटील यांनी त्या गाण्याचं शूटिंग केलं. शहरातील साईबाबा मंदिरात या गाण्याचं शूटिंग झाल असून शहरात कर्तव्य बजावतांना पोलीस तसेच लॉक डाऊन दरम्यानची स्थिती दाखवण्यात आली आहे. गाण लिहणार्‍या बडगुजर यांनीच आपल्या सुरेल आवाजात गाणं म्हटलं आहे. याद्वारे पोलीस निरीक्षकांचा खाकीतील दर्दी आवाजही लोकांसमोर आला आहे. यापूर्वीही बडगुजर यांनी अमळनेर येथे कार्यरत असतांना विविध भजन म्हटली आहेत .

कोरोनाला हरविण्यासाठी शासनाला सहकार्य करा

अनिल बडगुजर यांनी नाशिक ग्रामीण, मालेगाव त्र्यंबकेश्वर, मुंबई गडचिरोली, जळगाव अशा विविध ठिकाणी आतापर्यंत २६ वर्षांची सेवा बजावली आहे . शहरात बंदोबस्त दरम्यान बडगुजर यांनी नागरिकांना स्वखर्चातून मास्क चेही वाटप केले आहे . नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी तसेच अहोरात्र रस्त्यावर उभा राहून स्वतःच्या कुटुंबाला सोडून सेवा बजावणाऱ्या पोलिसांना सहकार्य करावे. जेणेकरून कोरोणाला हरवण्यासाठी शासनालाही उत्तम प्रकारे काम करता येईल, असे आवाहन दैनिक जनशक्तिशी बोलतांना केले आहे.

पहा व्हिडीओ