[व्हिडीओ] सर्वेनंतरच शरद पवारांची माढ्यातुन माघार – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

0

जळगाव – माढा या मतदारसंघात खा. शरद पवार यांनी सर्वेचा रिपोर्ट आल्यानंतर निवडणुकीतुन माघार घेतल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. खा. शरद पवारांची माघार हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी मारक असुन माढ्यात सर्वे वंचित बहुजन आघाडीच्या बाजुने असल्याचा दावाही त्यांनी आज पत्रकार परीषदेत केला.

वंचित बहुजन आघाडीने राज्यभर लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचाराच्या तयारीने जोर पकडला आहे. आघाडीच्या जळगाव लोकसभेच्या उमेदवार अंजली बाविस्कर आणि रावेर लोकसभेचे उमेदवार नितीन कांडेलकर यांच्या प्रचारार्थ जळगाव येथील शिवतीर्थ मैदानावर बहुजन वंचित आघाडीचा सत्ता संपादन महामेळावा होत आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज प्रकाश आंबेडकर यांनी आयोजीत पत्रकार परीषदेत माहिती देतांना सांगितले की, शरद पवारांनी माघार घेतल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रत जिंकणे आता आम्हाला सोपे झाले आहे. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे सामर्थ्य नसल्याने ते स्पर्धेत आहेत असे आम्ही मानत नाही. त्यामुळे या पाचही मतदारसंघात भाजप शिवसेना आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी अशी सरळसरळ लढत आहे. नांदेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी उभे राहावे की त्यांच्या पत्नीने हेच अजून निश्‍चीत होत नसल्याने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची ही अवस्था आहे तर मग इतरांची काय असेल हे सिध्द होते.

जळगावातुन ना. महाजन उमेदवार

जळगाव मतदार संघातील लोकसभेचे भाजपचे उमेदवार जाहीर झाले नाही. या प्रश्‍नावर उत्तर देतांना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, उमेदवार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन राहतील किंवा अन्य कुणी राहील असे ते म्हणाले.

सत्ता सर्वसामान्यांच्या हाती असावी

वंचित बहुजन आघाडीने प्रत्येक उमेदवाराच्या नावा मागे जात दर्शविली आहे. त्याचे कारण स्पष्ट करतांना आंबेडकर यांनी सांगितले की, प्रत्येक घराणेशाहीची की नातेवाईकांची उमेदवारी आहे हे सामान्य जनतेच्या लक्षात आले नाही, ते आम्हाला या माध्यमातून दाखवायचे आहे. सत्ता आणि विकास साधायचा असेल तर सर्वसाधारण माणसाच्या हातात सत्ता असली पाहिजे. अहमदनगर येथील शिवसेनेच उमेदवार प्रताप जाधव आणि राष्ट्रवादीचे उमेदवार शिनगे हे मामा भाचे आहेत त्यामुळे सत्ता ही घरातच राहणार आहे. त्यामुळे कुटूंबापेक्षा सर्वसामान्य व्यक्ती हा सत्तास्थानी पाहीजे असे त्यांनी पत्रकार परीषदेत सांगितले.