व्हॉटस्अपवर प्रश्नपत्रिका प्रकरणी विद्यापीठात गोंधळ ; पोलिसांचे पाचारण

0

कुलगुरूंनी तक्रार ऐकून न घेता पोलिसांना बोलावून बाहेर हाकलल्याचा आरोप

जळगाव: नूतन मराठा महाविद्यालयातील व्हॉटस्अ‍ॅपवर प्रश्नपत्रिका पाठवून झालेल्या परीक्षांप्रकरणी पुरावे सादर करण्यास गेलेल्या पियुष पाटील यांना पुरावे तक्रारी स्विकारण्याचा मला अधिकार नाही, प्राचार्य देशमुख यांच्या विरोधातील पुरावे तक्रारी स्विकारणार नाही, असे सांगितले. याचदरम्यान एम.सी.मेंबर असलेले दिपक बंडू यांनी पियुष पाटील यांना अरेरावी करत, हे खोटे पुरावे सादर करत आहेत, यांच्याकडे लक्ष देवू नका म्हणत आम्ही प्राचार्य देशमुख यांच्या पाठीशी असल्याचे सांगितल्याने वाद वाढून गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी कुलगुरुंनी पोलिसांना बोलवून पियुष पाटील यांच्यासह संबधितांना बाहेर हाकला अशी भाषा वापरल्याची माहिती पियुष पाटील यांनी बोलतांना दिली.

सदस्यासह पियुष पाटलांमध्ये शाब्दीक चकमक

नूतन मराठा महाविद्यालयातील पदवुत्तर विभागाच्या इंटर्नल परीक्षेदरम्यान व्हॉटस्अ‍ॅपवर प्रश्नपत्रिका पाठवून एकाच बेंचवर एकाच वर्गाचे विद्यार्थी बसवून परीक्षा घेण्यात आल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. याप्रकरणी पियुष पाटील यांनी विद्यापीठाच्या मेलवर याबाबत कारवाई करुन गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार तसेच त्याबाबतचे पुरावेही दिले आहेत. यावर चर्चा करण्यासाठी पियुष पाटील हे मंगळवारी विद्यापीठात गेले होते. यादरम्यान कुलगुरुंसह व्यवस्थापन सदस्य आदींची बैठक सुरु होती. याचवेळी भेटीसाठी निरोप आल्याने पियुष पाटील सभागृहात गेले. कुलगुरु तसेच प्र कुलगुरु यांना विषय समजावून सांगत असताना सदस्य दिपक बंडू यांनी पियुष पाटील यांना उद्देशून हे सर्व खोटे पुरावे सादर करत आहेत असे सांगत प्राचार्य देशमुख यांच्या पाठीशी असल्याचा शब्दोउच्चार केला.

कारवाईचे तोंडीही नाही, लेखीही आश्वासन नाहीच

यानंतर दोघांमध्ये शाब्दीक चकमकी उडाल्यानंतर कुलगुरुंनी पोलिसांना बोलवून पियुष पाटील यांच्यासह तरुणांना बाहेर हाकलून लावा, अशी भाषा वापरली. यावरुन आणखीनच गोंधळ उडाल्याने यावेळी स्थानिक गुन्हे शाखेसह पोलिसांचा बंदोबस्त मागविण्यात आला होता. पोलिसांनी पियुष पाटील यांच्यासह तरुणांना दुसर्‍या खोलीत घेवून विषय समजून घेतल्यावर वादावर पदडा पडला. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अ‍ॅड. कुणाल पवार, फार्मसी स्टुडेंट कौन्सिल महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष भूषण भदाणे यांचीही उपस्थिती होती. न्याय मिळावा यासाठी पुराव्यासह चर्चा करण्यास गेलो होतो, मात्र विद्यापीठाकडून कारवाईचे तोंडीही नाही व लेखी आश्वासन मिळाले नाही. उलट वादाला सामोरे जावे असे पियुष पाटील यांनी सांगितले.