शनिमांडळ येथील एका महिलेवर अत्याचार

0

संशयिताविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

नंदुरबार। तालुक्यातील शनिमांडळ येथील एका महिलेवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अशोक उर्फ छोटू रामभाऊ पाटील या संशयिताविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मे 2015 पासून धमकी देत अत्याचार सुरू होता, असे त्या महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार अशोक पाटील याच्याविरुद्ध atracity व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.