शनिवारी भव्य अग्रसेन भवनाचे उद्घाटन

0

पिंपरी-चिंचवडमधील पहिलेच भवन

चिंचवड- चिंचवड येथे बनविण्यात आलेल्या पहिला भव्य आणि बहुमजल्यांचे श्री अग्रसेन भवन अग्रवाल समाजाच्या एकताचा एक आदर्श आहे. पिंपरी चिंचवड महानगर परिसरात अग्रवाल समाज गेल्या 30 वर्षापासून राहत आहे, परंतु समाजाचे स्वत:चे असे एकही भवन नव्हते, या उद्देशास पूर्ण करण्याचे कार्य श्री अग्रसेन ट्रस्ट, चिंचवड-प्राधिकारणच्या वतीने करण्यात आले आहे. पुणे- मुंबई रोड, चिंचवड येथे श्री अग्रसेन भवनचे निर्माण केले आहे. ज्याचे उदघाटन 23 मार्चला वास्तुशांती, मूर्ति स्थापना, पूजा व हवनचे आयोजन केले आहे. तसेच यावेळी विविध लोकांचे सम्मान करण्यात येणार आहे. या भव्य दिव्य चार मजल्याच्या श्री अग्रसेन भवनचे लोकार्पण अग्रवाल समाज फेडरेशन पुणे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. लोकापर्ण संमारंभास प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे अतिरिक्त आयुक्त पुणे मनपा रुबल अग्रवाल उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत श्री अग्रसेन ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष देवीचंद बंसलने दिली.

यांची होती उपस्थिती
यावेळी ट्रस्टचे सचिव कृष्णलाल बंसल, खजिनदार जोगिंदर मित्तल, भवन निर्माण अध्यक्ष प्रेमचंद मित्तल, भवन निर्माण सहअध्यक्ष विनोद बंसल, भवन निर्माण सदस्य सुनिल अग्रवाल उपस्थित होते.
श्री अग्रसेन ट्रस्ट, चिंचवड-प्राधिकारणच्या वतीने नव निर्मित श्री अग्रसेन भवन संदर्भात अधिक माहिती देत, अध्यक्ष सुभाष बंसल म्हणाले की, हे भवन पाच मजल्याचे बनविण्यात आले आहे. प हिल्या मजल्यावर कॉसमॉस बँक आहे. दुसर्या मजल्यावर 5 हजार स्क्वेअर फुटाचा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भव्य ए. सी. हॉल बनविण्यात आला आहे.

आत्याधुनिक सुविधा
अत्याधुनिक एक हजार फुटात किचन आणि भोजन व्यवस्थेसाठी 4 हजार स्क्वेअर फुटाची जागा उपलब्ध आहे. चौथ्या मजल्यावर श्री अग्रसेन ट्रस्टचे सुसज्ज कार्यालय आणि कॉन्फ्रेंस हॉल आणि पैंट्री आहे. तसेच पाचव्या मजल्यावर वर-वधू आणि पाहुण्यासाठी चार सुसज्ज ए.सी. खोल्या आहेत. तसेच एक मोठा मल्टीपर्पज हॉलचे निर्माण केले आहे. त्याचप्रमाणे भवनात 8 व्यक्ती क्षमताच्या दोन लिफ्ट जनरेटर बैकअप सोबत उपलब्ध आहे. आपली सामाजिक जवाबदारी पार पाडत ट्रस्टच्यावतीने गरजू लोकांच्या उपचारासाठी श्री अग्रसेन हॉस्पिटलचे देखील निर्माण केले आहे.