शरद पवार हिंदूविरोधी : राष्ट्रीय वारकरी परिषद

0

मुंबई: शरद पवार हे हिंदूविरोधी असून त्यांना या पुढे वारकऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलवू नका असे पत्रक राष्ट्रीय वारकरी परिषदेने जाहीर केले आहे. शरद पवार हे नेहमी हिंदू धर्माला विरोध करत असून, रामायणाला ते विरोध करतात, ते नेहमी नास्तिक लोकांना पाठींबा देत असल्याचे पत्रात नमूद केल आहे. या वरून राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय वारकरी परिषदेत वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शरद पवार यांना यापुढे वारकऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलवण्यात येऊ नये, अशा आशयाचे पत्रक महाराजांनी जारी केलं आहे. वक्ते महाराजांना २०१८ सालचा महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणारा ग्यानबा तुकाराम पुरस्कार मिळालेला आहे. त्यांची हिंदुत्वावादी संघटनांशी जवळीक असल्याची चर्चा नेहमीच होत असते. हिंदुत्ववाद्यांबरोबर काम करणारे म्हणून वारकरी संप्रदायामध्ये त्यांना ओळखले जाते. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात असणाऱ्या वारकऱ्यांवर वारकरी परिषदेचा प्रभाव आहे. खास करुन मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भामध्ये वारकऱ्यांची संख्या मोठी आहे. म्हणूनच वक्ते महाराजांनी जारी केलेल्या या पत्रकामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.