शस्त्र बाळगल्याबद्दल तरूणावर कारवाई

0

तळेगाव दाभाडे – येथील पोलीस हद्दीत विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी एका तरूणावर कारवाई करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव धनंजय बाळासाहेब टकले (वय 18, रा. टकले वस्ती) असे आहे. तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत नभांगण सोसायटीचे समोर टकले वस्तीकडे जाणार्‍या कच्च्या रोडने एक तरूण बेकायदा विनापरवाना घातक शस्त्रे जवळ बाळगत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांना मिळाली. उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर बाजगिरे, यांच्या पथकाने सायंकाळी 4 वाजता सापळा रचून टकले यास ताब्यात घेतले. तपासणी केली असता त्याच्याकडे दोन तलवारी, दोन कोयते व एक गुप्ती अशी धारधार घातक शस्त्रे मिळाली.

पुढील तपास डी.वाय.एस.पी. माडगुळकर, पोलीस निरीक्षक तळेगाव दाभाडे संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर बाजगीरे, वैभव सोनवणे, युवराज वाघमारे, विश्‍वास पाटील, विठ्ठल वडेकर करीत आहे