शहादा ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा

0

शहादा : कोरोना विषाणू संदर्भात राज्यात आरोग्य यंत्रणा सर्वत्र सतर्क झाली आहे आरोग्य विभागातील कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहे त्यांचे पूर्ण देश वासी आभार व्यक्त करून अभिनंदन करीत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला शहरातील नगरपालिका ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य विभागाच्या काही कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणा उघडकीस आला असून एका तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलीला जी तापाने फणफणत होती तिची आई खांद्यावर घेऊन उपचारासाठी विनवण्या करत होती ग्रामीण रुग्णालयात नेले असता उपचार न करता आईला परतून लावले ही गंभीर बाब आहे.

गेल्या दोन दिवसापासून दिपीका दिलीप सकट किती वर्षाची मुलगी तापाने आजारी होती. आज रोजी तिचा ताप जास्त वाढल्याने तिची आई मंगला दिलीप सकट आपल्या सासूबाईला घेऊन नगरपालिका ग्रामीण रुग्णालयात आली. माझा मुलीला जास्त ताप आहे तिला उपचार करा. अशा विनवण्या केल्या पण उपचार न करता तिला परतवून लावल्याची माहिती मुलीच्या आईने दिली. मंगलाबाई दिलीप सकट ही आपल्या पतीसह मजुरी करते मुलीला उपचारासाठी पैसे नसल्याने ती ग्रामीण रुग्णालयात गेली. वास्तविकता ग्रामीण रुग्णालयाचा कर्मचाऱ्यांनी तो कोणता आजार आहे. त्यापेक्षा तिच्यावर प्राथमिक उपचार करणे गरजेचे होते आणि ते सर्वांचे कर्तव्य आहे आरोग्य विभागातील कर्मचारी रात्रंदिवस मेहनत करत आहे. ना करून चालत नाही पण वेळ आणि प्रसंगाच्या भान ठेवणे गरजेचे आहे. आता त्यांना कोणी परतवून लावले नेमके काय झाले त्यापेक्षा कोणताही रुग्ण आल्यास त्याच्यावर उपचार करणे महत्त्वाचे आहे.

मुलीची आई मंगलाबाई सकट ही आपल्या सासुबाई सह आपल्या लहान मुलीला घेऊन शहरातील एका ज्येष्ठ पत्रकार संजय राजपूत घरी गेल्याने अखेर न्याय मिळाला संबंधित पत्रकाराने शहरातील पत्रकारांना संदेश देऊन प्रांत अधिकारी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. लागलीच रुग्णवाहिका पाठवून त्यांच्यावर उपचार केला जाईल असे सांगितले मात्र रुग्णवाहिका आली नाही शेवटी पत्रकार प घटनास्थळी आल्यावर त्यांनीही अधिकाऱ्यांना कळवले. नाईलाजाने परत त्या लहान मुलीला आपली आई व सासुबाई पुन्हा ग्रामीण रुग्णालयात पाई पाई गेले पत्रकारांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना विचारणा करून तिच्यावर उपचार करायला लावले त्यावेळेस मुलीच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर येत होते शहरातील पत्रकारांनी मुळे मजुरी करणाऱ्या महिलेच्या मुलीवर उपचार झालेत.

प्रांत अधिकारी डॉक्टर चेतन सिंग गिरासे यांनी पत्रकारांच्या तक्रारीवरुन गंभीर दखल घेऊन नगरपालिका ग्रामीण रुग्णांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांची कानउघडणी केली कोणताही रुग्ण असो आपण अगोदर प्राथमिक चौकशी करावी त्याचे उपचार करावेत हे बंधनकारक आहे. कोणत्याही प्रकारच्या हलगर्जीपणा करू नये अशी ताकीत त्यांनी दिली प्रांत अधिकारी डॉक्टर चेतन सिंग गिरासे यांनी दखल घेतल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र पेंढारकर यांनी देखील ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना सूचना दिली.