शहादा पालिका प्रशासनाकडून ठिकठिकाणी किटक, जंतू नाशकाची फवारणी

0

शहादा। कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. शहादा पालिका प्रशासनाकडून ठिकठिकाणी किटक आणि जंतू नाशकाची फवारणी केली जात आहे. काहींनी आपले ट्रॕक्टर पालिकेला देवून फवारणी कामी मदत केली आहे.

देशात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च पासून संपूर्ण देशात संचारबंदी अर्थात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. जनतेने घरातच राहण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. शहादा शहरात संचारबंदीचे नियम पाळले जात असून पालिका प्रशासन कंबर कसून कोरोना संदर्भात उपाय योजना करीत आहेत.

फवारणीसाठी शहरातील गुजर गल्लीतील रहिवासी मनोज भाईदास पाटील यांनी फवारणी कामी आपले ट्रॕक्टर दिले आहे.तसेच विशिष्ट भागात फवारणी करणे सोपे जावे अशा पद्धतीने त्यांनी ट्रॕक्टरची रचना केली आहे.गेल्या दोन दिवसांपासून ट्रॕक्टरच्या माध्यमातून फवारणी केली जात आहे.फवारणीत अल्फागार्ड टेन हे किटक नाशक औषध वापरले जात आहे.जमिनीत निर्माण होणाऱ्या विषाणूंना नष्ट करण्यात औषध उपयोगी असल्याने पुण्याहून औषध मागविण्यात आले आहे.शहरात फवारणीसाठी मुख्याधिकारी वाघ,स्वच्छता निरीक्षक राजेंद्र चव्हाण व त्यांची टीम कार्यरत आहे.