शहादा येथे 5,732 कुटूंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

0

शहादा : कोविड -१९ या विषाणूचा फैलावाने सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे.त्यामुळे गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी शहादा येथील गंगोत्री फाउंडेशन व तालुका एज्युकेशन संस्थेतील कर्मचारी वर्गाच्या संयुक्त विद्यमाने जीवनावश्यक वस्तूंचे ५ हजार ७ ,३२ किट तयार करून (ता.३१ व १ एप्रिल) शहरासह तालुक्यातील गरीब कुटुंबियांना त्याचे वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

कोरोना या विषाणूचा संकटामुळे सर्वत्र सर्वत्र लॉक डाऊन असल्याने अनेक लोक घरात बंदिस्त आहे. मोलमजुरी करून उपजीविका भागवणाऱ्यांचे मात्र हाल होत आहेत. रोजगार बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी शहादा येथील गंगोत्री फाउंडेशन व तालुका एज्युकेशन सोसायटीच्या कर्मचारी वर्गाच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील व शहरातील सुमारे पाच हजार ७ गरीब ३२ कुटुंबांसाठी जीवनाश्यक वस्तुंचे किट तयार करून घरोघरी जाऊन त्याचे वाटप करण्यात येत आहे. संस्थेच्या शहादा येथील विश्राम काका शैक्षणिक संकुलाच्या हॉलमध्ये प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे यांच्या उपस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार करण्यात. यावेळी गंगोत्री फाउंडेशनचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती अभिजित पाटील, प्रीती पाटील, आदींसह कर्मचारी उपस्थित होते.