शहाद्यातील वर्डेत बिबट्या पडला विहिरीत; नागरिकांमध्ये भीती !

0

कुत्र्याचा पाठलाग करताना घडली घटना : बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाचे कसोशीचे प्रयत्न

शहादा : तालुक्यातील वर्डे येथे कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या व कुत्रा दोन्ही विहिरीत पडल्याची घटना शुक्रवारी रात्री घडल्याने परीसरात खळबळ उडाली आहे. वनविभागाच्या कर्मचार्‍यांकडून कसोशीने बिबट्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चार महिन्यांपूर्वीच या भागात बिबट्या असल्याची माहिती वनविभागाला नागरीकांनी दिल्यानंतरही वनविभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी रात्री कुत्र्याच्या शिकारीत असलेला बिबट्या त्याचा पाठलाग करीत असताना गावातील विहिरीत पडला तर बिबट्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थांमध्ये भीतीदेखील पसरली होती.