शहाद्यातील वर्डे गावात आढळला बिबट्या; नागरिकांमध्ये भीती !

0

शहादा : तालुक्यातील वर्डे त.सा. गावातील विहिरीत बिबट्या आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीने वातावरण पसरले आहे. गावातील एका कोरड्या विहिरीत बिबट्या आढळल्याची चर्चा पूर्ण गावात पसरली त्यानंतर गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. वर्डे गावाच्या परिसरात बिबट्या असल्याची चर्चा तीन चार महिन्यापूर्वी होतील. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. आज मध्यरात्री बिबट्या पाण्याच्या शोधात गावात असता विहिरीत पडला. याबाबत वन विभागाला कळविण्यात आल्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी फौजफाटा गावात दाखल झाला आहे.