शासनाच्या कार्यवाही अभावी पशुपालन धोक्यात

0
श्रीगोंदा :  श्रीगोंदा तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई आणि त्यातच चाऱ्याचे गगणाला भिडलेले भाव, यामुळे श्रीगोंदा तालुका परिसरातील पशुधन धोक्यात आले आहे. काळजावर दगड ठेवून जिवापाड जपलेल्या गाई- गुरे- म्हशींची विक्री करण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे. काष्ठी ता श्रीगोंदा येथील बाजारात परिसरातील पशुधन मोठ्या प्रमाणात विक्रीस जात आहे. पशुपालकांच्या मजबुरीचा गैरफायदा व्यापारी, दलाल घेत आहेत.  महाराष्ट्र सरकार अजूनही छावण्यांना मंजुरी देत नसल्यामुळे हि परस्थिती उद्भवली आहे, असा आरोप शेतकरी वर्गातून होताना दिसत आहे. मात्र प्रशासन नेहमीप्रमाणे बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे.
 श्रीगोंदा तालुक्यातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणात पाण्याची भीषण टंचाई आणि त्यातच चाऱ्याचे गगणाला भिडलेले भाव, यामुळे श्रीगोंदा परिसरातील पशुधन धोक्यात आले आहे. काळजावर दगड ठेवून जिवापाड जपलेल्या गाई- गुरे- म्हशींची विक्री करण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे. काष्ठी येथील बाजारात परिसरातील पशुधन मोठ्या प्रमाणात विक्रीस जात आहे. पशुपालकांच्या मजबुरीचा गैरफायदा व्यापारी, दलाल घेत आहेत. अल्प पर्जन्यामुळे संपूर्ण तालुक्याला दुष्ळाळाच्या झळा सहन कराव्या लागत आहे.
शासनाने श्रीगोंदा तालुका टंचाईग्रस्त म्हणून घोषित केला आहे. मात्र तो कागदावरच राहिला आहे कि काय कारण तालुक्यात माणसांप्रमाणेच जनावरे आणि वन्य जीवांचीही होरपळ वाढली आहे. पाणी टंचाईमुळे पशुपालक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.त्यात सरकारकडून छावण्या सुरु करण्याचे आश्वासन देण्यात आलेण. त्यासाठी मोठ्या प्रमाणात सर्व्हे ही करण्यात आला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात कागदेही रंगवण्यात आली. मात्र अस्तित्वात अजून काहीच नाही प्रत्यक्षात आतापर्यंत एकही छावणीला मंजुरी मिळलेली नाही. त्यामुळे पाणी नाही आणि चाराही नाही त्यामुळे तालुक्यातील पशुधन तालुक्यातील काष्ठी येथील बाजारात विक्रीसाठी नाहीतर खाटीक याना कत्तलीसाठी विकली जात आहे. त्यामुळे तालुक्यातील पशुधन धोक्यात आले असून छावणीच्या बाबतील सरकारने लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे; अशी मागणी शेतकरी वर्गातून होताना दिसत आहे.
चाऱ्याअभावी पशुधनाची कमी भावात विक्री
यंदा पाण्याअभावी श्रीगोंद्यासह परिसरातील शेतकऱ्यांना दूबार हंगाम घेता न आल्यामुळे चारा टंचाई निर्माण झाली आहे. चाऱ्याच्या भाववाढीने पशुपालक मेटाकूटीला आले असून व्यापाऱ्यांची मात्र चांदी होत आहे. जिवापाड जपलेली गाई, गुरे, बैल, म्हशी चारा- पाण्याअभावी विक्रीस काढण्याची नामुष्की पशुपालकांवर आली आहे. संकटग्रस्त पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या उभारण्याची गरज अधोरेखीत होत आहे.