शासनाच्या योजना तळागाळातील लाभार्थीपर्यंत पोहोचणार

0

भुसावळचे नूतन तहसीलदार महेंद्र पवार यांची ग्वाही

भुसावळ- भुसावळचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांची नंदुरबार येथे बदली झाल्याने त्यांच्या जागेवर त्र्यंबकेश्‍वरचे महेंद्र पवार यांची बदली करण्यात आली होती. 1 रोजी त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने प्रशासनाने दिलेली जवाबदारी नेटाने पार पाडण्यासह शासनाच्या योजना तळागाळातील गरजूपर्यंत पोहोचण्यात येतील तसेच पारदर्शी प्रशासनाचा कारभार असेल, अशी ग्वाही त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दिली. पवार यांचे तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांतर्फे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी निवडणुकीसंदर्भात सुरू असलेल्या कामांची माहिती जाणून घेतली.