शाहीनबाग आंदोलनाविरोधातील याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी !

0

नवी दिल्ली: सीएए आणि एनआरसी विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीतील शाहीनबाग येथे आंदोलन सुरु आहे. उच्च न्यायालयाने आंदोलकांना हटवण्यासाठी दिल्ली पोलिसांना प्रयत्न करण्यास सांगितले होते. मात्र, पोलिसांच्या आवाहनानंतरही आंदोलकांनी आंदोलन सुरु ठेवले आहे. दरम्यान शाहीनबागध्ये सुरु असलेल्या आंदोलनाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सर्वोच्य न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांमध्ये दिल्लीला नोएडाशी जोडणारा महच्वाचा रस्ता आंदोलनामुळे बंद असल्याचे सामान्य नागरिकांची गैरसोय होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान शाहीनबागमधील आंदोलक रविवारी गृहमंत्री अमित शहा यांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला होता. मात्र आंदोलकांनी अमित शहा यांची वेळ घेतलेली नसल्यानं पोलिसांकडून मोर्चा रोखण्यात आला होता.