‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्या तरुणीच्या कोठडीत वाढ !

0

बंगळूर: कर्नाटकातील बंगळूर येथे सीएए आणि एनआरसी विरोधात झालेल्या सभेवेळी अम्युल्या लिओना या तरुणीने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. यावेळी व्यासपीठावर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असुद्दिन ओवैसी उपस्थित होते. त्यांच्या समोरच अम्युल्या लिओनाने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. दरम्यान या तरुणीला अटक करण्यात आली. तिला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तिच्या न्यायलयीन कोठडीत वाढ झाली आहे. ५ मार्च पर्यंत या अम्युल्या लिओनाच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे.

अम्युल्या लिओनावर देशद्रोहाच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.