शाहीन बाग आंदोलनकर्त्यांची अमित शहांच्या घरावर मोर्चा; पोलिसांनी रोखले !

0

नवी दिल्ली: केंद्र सरकारने एनआरसी आणि सीएए कायदा लागू केल्यापासून संपूर्ण देशात विरोधात मोर्चे निघत आहे. दोन महिन्यांपासून सातत्याने विरोध सुरु आहे. दिल्लीतील शाहीन भाग येथे आंदोलन सुरु आहे. आज शाहीन बागेत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घरावर मोर्चा काढला. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा रोखला आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांकडून चर्चेला बोलविले आहे का?, शिष्टमंडळात कोण आहेत? आदी प्रश्न उपस्थित करत पोलिसांनी हा मोर्चा रोखला आहे.