शाहूनगरातील दुसर्‍या दिवशी 55 घरांचे अतिक्रमण काढले

0

जळगाव– शाहुनगरातील अतिक्रमीत बांधकाम काढण्याची मोहिम मनपाने कालपासून सुरु केली.पहिल्या दिवशी 57 तर दुसर्‍या दिवशी 55 घरांचे अतिक्रमण काढण्यात आले आहे.दरम्यान,कारवाई करताना मनपा कर्मचारी आणि अतिक्रमणधारक यांच्यात वाद झाला.त्यामुळे काहीवेळ तणाव निर्माण झाला होता.यावेळी पोलीस बंदोबस्त होता मात्र पोलिसांनी बघ्यांची भूमिका असल्याचे दिसून आले.

शाहूनगर येथील पोलिस चौकी ते ट्रॅफिक गार्डन रस्त्यावरच्या बाजूला मोठी गटार आहे. या गटारीवर नागरिकांनी पक्के बांधकाम करून घराचा भाग वाढवून, बाथरूम, शौचालये, लोखंडी जिने लावून अतिक्रमण केले होते. नागरिकांच्या तक्रारीवरून महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने मंगळवार पासून गटारीवरील अतिक्रमण निर्मुलनाची कारवाई करण्यात आली. दुसर्‍या दिवशी देखील कारवाईला सुरवात केली. यावेळी नागररचना विभाग, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा, विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते.

वाद झाल्याने गोंधळ

पोलिस चौकी ते ट्रॅफिक गार्डन पर्यंतच्या रस्त्यालगत गटारीवर सुमारे दीडशे घरांचे पक्के बांधकाम आहे. हे अतिक्रमण काढतांना मनपा अधिकारी , कर्मचारी यांच्याशी अतिक्रमणधारकांनी वाद घातल्याने चांगलाच गोंधळ उडला. पहिल्या दिवशी पोलीस कर्मचार्‍यांनी वाद होतांना मध्यस्ती करून वाद मिटवले. मात्र बुधवारी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी केवळ बघ्यांची भूमीका घेतली.