शिंदखेडा पंचायत समितीच्या लाचखोर लघूसिंचन अभियंत्याला कोठडी

0

शिंदखेडा- एमआरजीएस योजनेंतर्गत सिंचन विहिरीच्या मंजूर अनुदानातील एक लाख 13 हजार 120 रुपयांचे बिल काढून देण्यासाठी चार हजारांची मागणी करणार्‍या शिंदखेडा पंचायत समितीतील लघू सिंचन विभागाचे कनिष्ठ अभियंता शरद फकिरा पाटील (52) यांना मंगळवारी दुपारी लाच घेताना सोनगीर बसस्थानकात रंगेहाथ अटक करण्यात आली होती. आरोपीविरुद्ध सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यास बुधवारी न्यायालयात हजर केले असता एका दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांनी सांगितले.