शिरपूरला ५५ वर्षीय महिलेची आत्महत्या

शिरपूर। शहरातील बसस्थानक परिसरातील एका ५५ वर्षीय महिलेने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली. राजश्री रविकिरण चव्हाण असे गळफास घेणार्‍या महिलेचे नाव आहे. त्या खान्देशातील नेत्ररोग तज्ज्ञ व आरोग्य उपसंचालक, कै.डॉ.रविकिरण चव्हाण यांच्या धर्मपत्नी असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पो.हे.कॉ.गुरुदत्त पानपाटील हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. महिलेचा मृतदेह खाली उतरवित उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ.पवार यांनी तपासणी करून तिला मयत घोषित केले. वार्डबॉय प्रवीण पाटील यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास पो.ना.अशोक धनगर करीत आहेत.