शिर्डी येथील हत्याकांडाप्रकरणी अ‍ॅट्रॉसिटी दाखल करा

0

अमळनेर ठाकुर समाज मंडळाचे प्रांधिकार्‍यांना निवेदन

अमळनेर- शिर्डी येथे दि.१३ जुलै रोजी ठाकूर कुटुंबियांच्या तिहेरी हत्याकांडाबाबत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी व पीडित परिवाराला शासनाकडून मदत व संरक्षण मिळावे म्हणून अमळनेर ठाकूर समाज मंडळातर्फे आज प्रांताधिकारी सिमा अहिरे यांना निवेदन देण्यात आले.
शिर्डी येथे आदिवासी ठाकूर परिवारातील नामदेव ठाकूर, वृद्ध पत्नी व नात अश्या तिघांची निर्घृणपणे गळे चिरून हत्या करण्यात आली. परिवारातील राजेंद्र ठाकूर व एक मुलगी जखमी असून दवाखान्यात दाखल आहेत. संपूर्ण परिवारच संपविण्याचा घाट आरोपीने घातला होता म्हणून संबंधित आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी. सदर मृत हे आदिवासी ठाकूर जमातींचे असल्याने ऍट्रासिटी अक्ट अंतर्गत गुन्हे नोंद व्हावेत अशी मागणी प्रांताधिकारी सिमा अहिरे यांचेकडे राज्य सरचिटणीस रणजित शिंदे, अमळनेर अध्यक्ष दिलीप ठाकूर, कार्याध्यक्ष जितेंद्र ठाकूर,सरचिटणीस प्रकाश वाघ,उपाध्यक्ष संजय ठाकूर यांनी केली.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी नथ्थुबापू वानखेडे, दिलीप वानखेडे, अर्बन बँक संचालक शांताराम ठाकूर, पदाधिकारी अनिल ठाकूर, युवक अध्यक्ष गुणवंत वाघ,किरण ठाकूर,नारायण वानखेडे,अनिल सोमा ठाकूर, महिला अध्यक्षा मिनाबाई ठाकूर,अपेक्षा पवार,बेबीबाई वानखेडे, नारायण वानखेडे,देविदास ठाकूर, सुखदेव ठाकूर,साहेबराव पवार,विजय ठाकूर, गजाजन ठाकूर, काशिनाथ ठाकूर, यशवंत सुर्यवंशी, निलेश वाघ, बाळकृष्ण ठाकूर,अरुण ठाकूर,प्रकाश ठाकूर,संजय सुर्यवंशी, राजेंद्र ठाकूर,रामदास ठाकूर, शालिक ठाकूर,हिंमत ठाकूर,लोटन ठाकूर,आदिंनी घटनेचा याप्रसंगी जाहिर निषेध नोंदविला आहे.