शिवसेनेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी नाही !

0

नवी दिल्ली : सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेने राज्यपालांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार होती, मात्र आज तातडीने यावर सुनावणी होणार नाही. शिवसेनेने काल मंगळवारी याचिका दाखल केली होती, मात्र दुसऱ्या दिवशी आज सकाळी बुधवारी याचिका दाखल करावी असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. परंतु, आता शिवसेनेचे वकील सुनिल फर्नांडिस यांनी नव्याने याचिका दाखल करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल कोर्टात सेनेची बाजू मांडणार आहेत.

सुनावणी तातडीने घ्यायची की ड्यू कोर्समध्ये करायची हे शिवसेनेच्या वकिलांनी ठरवायचे होते. ड्यू कोर्स म्हणजे रेग्युलर याचिका. म्हणजे जेव्हा न्यायालय वेळ देईल, तेव्हा सुनावणी घेण्यास याचिकाकर्ता तयार आहे, असा अर्थ होतो. यात 7-8 दिवसांचा कालावधी लागू शकतो. तातडीने सुनावणी घ्यायची असेल तर तशी मागणी याचिकाकर्त्याला करावी लागते.