BREAKING: शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे तर प्रतोदपदी सुनील प्रभू !

0

मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर अद्याप सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालेला नाही. दरम्यान काल भाजपनंतर आज शिवसेनेने आपला विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची एकमताने निवड केली. शिवसेना आमदारांच्या बैठकीत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. तसेच यावेळी सुनील प्रभू शिवसेनेचे पक्षप्रतोद पदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी देखील एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते होते. पुन्हा त्यांच्याकडेच ही जबाबदारी देण्यात आली आहे.

सत्ता स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी आज शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची शिवसेना भवन येथे बैठक झाली. यात राजकीय परिस्थितीवर खलबते झाली.