शिवसेनेला पाठींबा देण्याची कॉंग्रेसची तयारी: दलवाई

0

मुंबई: विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहे. कोणत्याही पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. भाजपने ९९, शिवसेना ५७, कॉंग्रेस ४४ तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने ५५ जागांवर आघाडी मिळविली आहे. दरम्यान अशी त्रिशंकू अवस्था असताना कॉंग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी कॉंग्रेस शिवसेनेला पाठींबा देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे असे विधान केले आहे. असे असले तरी याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेईल असेही त्यांनी म्हटले आहे.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्र येईल अशी चर्चा होत असताना दलवाई यांच्या विधानाला महत्त्व आहे.