शिवसेनेसाठी भाजपची दारे खुली: चंद्रकांत पाटील

0

मुंबई : राज्यातील जनतेने शिवसेना-भाजप महायुतीला जनादेश दिला आहे. या जनादेशाचा आदर करुन लवकरात लवकर सरकार स्थापन करु. सरकार स्थापन करण्याबाबत शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. शिवसेनेकडून लवकरच प्रस्ताव येईल, शिवसेनेच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी भाजपची दारे नेहमी खुली आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आज मंगळवारी भाजपची कोअर कमिटीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकात पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.

सरकार स्थापन करण्याबाबत शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. शिवसेनेकडून लवकरच प्रस्ताव येईल, शिवसेनेच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी भाजपची दारे नेहमी खुली आहेत, असे चंद्रकांत पाटलांनी म्हटले आहे. मात्र राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातचे सरकार स्थापन होईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.