Wednesday , November 21 2018
Breaking News

शिस्तबद्ध पर्यटनासाठी दुर्गादेवी देवराईमध्ये महास्वच्छता

जुन्नर । जुन्नर तालुका पर्यटन तालुका नुकताच घोषित करण्यात आला आहे. येथील परिसरात शिस्तबद्ध पद्धतीने पर्यटन कसे घडेल यासाठी हातवीजच्या दुर्गवाडी येथील अतिदुर्गम भागातील देवराई मध्ये पुर्व पावसाळी महास्वच्छता, वृक्ष व बिजारोपण उपक्रम, चला मारू फेरफटका परिवार व निसर्ग रम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज परीवारातर्फे राबविण्यात आला होता. या उपक्रमात महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी चिंचवड, नगर, पारनेर, संगमनेर सोलापूर, उस्मानाबाद, बिड, कोल्हापूर, अमरावती, परभणी, कोकण, अकोला, मुंबई, नाशिक अशा अनेक जिल्ह्यतील 350 पर्यटक सहभागी झाले होते.

पर्यटकांना जुन्नर तालुक्याविषयी मार्गदर्शन, स्वच्छता अभियान व वृक्ष व बिजारोपणाची जबाबदारी माजी सैनिक रमेश खरमाळे (वनरक्षक) यांना देण्यात आली होती. याआधी पण हा उपक्रम जुन्नर तालुक्यातील किल्ले जीवधन, नाणेघाट, किल्ले हडसर, किल्ले नारायणगड, हटकेश्‍वर व शिवसृष्टी जुन्नर येथे मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आला होता. निसर्ग भटकंतीत पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची इजा पोहचू नये. पर्यावरण टिकविणे हाच उद्देश ठेवून व अशी प्रार्थना करूनच फेरफटका मारला जातो. वड, उंबर व जांभूळ या वृक्षाची रोपे दुर्गादेवी परीसरात वनपरीक्षेत्र जुन्नरच्या वनरक्षक तेजस्विनी भालेकर यांच्या मार्गदर्शनाने लावण्यात आली. जवळपास पाच एकर क्षेत्रात विविध बियांचे रोपण करण्यात आले. स्वच्छता अभियानात जवळपास 45 बॅगा प्लास्टीक, पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक ग्लास, दारूच्या बाटल्या यावेळी भर पावसात गोळा करण्यात आल्या.

निसर्गाचाही घेतला आनंद
पर्यटकांनी खरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गादेवी दर्शन, तीन हजार फुट खोल कोकणकडा दर्शन, दुर्गेचा डोंगर, आंबे घाट व आंबे येथील घंटेसारखे वाजणारे दगड याचा भरभरून आनंद घेतला. चला मारू फेर फटका कोअर कमिटीचे सदस्य एस. आर. शिंदे यांनी पर्यटकासाठी शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन केले होते. यावेळी चला मारू फेर फटका परीवारातील राजेश देशमुख, बाळासाहेब चव्हाण, हरिभाऊ दुधाळ, किरण कांबळे, कृष्णा परिट, सुनील धुमाळ, बळीराम कातांगळे, राजेंद्र माने, योगेश चौधरी, विश्‍वजीत पवार, नाना नलावडे, उद्धव वाजंळे, शरद गिरवले, चंद्रकांत भोसले, भरत बिडवे तसेच निसर्गरम्य जुन्नर तालुका परिवाराचे विनायक साळुंके, स्वाती खरमाळे हातवीज गावचे ग्रामस्थ रघुनाथ पारधी व सोनावळे गावातील सैराट टिमचे विशाल बोर्‍हाडे व टिम उपस्थित होती.

About admin

हे देखील वाचा

शहरातील जैवविविधतेचा महापालिका करणार सर्व्हे

सल्लागार समितीची केली स्थापना पिंपरी-चिंचवड : शहरातील जैवविविधतेचे महापालिकेमार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानुसार जानेवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!