शेंदुर्णी न.पा.उपनगराध्यक्ष पतीकडून कर्मचाऱ्यास शिवीगाळ; कर्मचाऱ्यांचे लेखनी बंद !

0

शेंदुर्णी (विलास अहिरे): नगर पंचायतीच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुक संजय पायघन यांना उपनगराध्यक्ष यांचे पती आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांनी शिवीगाळ करत त्यांच्या दिशेने खुर्ची फेकून मारल्याची घटना काल बुधवारी घडली. या घटनेच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी आज गुरुवारी लेखनी बंद आंदोलन केले आहे. ९० हजारांचे बिल काढण्यावरून हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले असून उपनगराध्यक्ष यांना बडतर्फ करून गोविंद अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.