शेअरबाजारात २४०० अंकांची घसरण

0

मुंबई: कोरोन विषाणूचा जागतिक बाजारपेठेवर परिणाम होत असून, त्याचा परिणाम मुंबई शेअरबाजारावर दिसून येत आहे. मागच्या काही दिवसापसुन मुंबई शेअरबाजारात सातत्याने घसरण होत आहे. गुरुवारी सकाळी मुंबई शेअरबाजार सुरु होताच शेअरबाजारात २४०० अंकाची घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये सुद्धा ५०० अंकांची घसरण झाली आहे.

मार्च २०१८ नंतर पहिल्यांदाच निफ्टी १० हजाराच्या खाली आला आहे. ४० हजारापर्यंत पोहोचलेल्या सेन्सेक्समध्ये ३३ हजारापर्यंत घसरण झाली आहे. आरबीआयने येस बँकेवर निर्बंध घातले आहे. सौदी अरेबिया आणि रशियात तेल दरावरुन युद्ध सुरु आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात घसरण झाली आहे. सेन्सेक्सची पडझड होण्यामागे ही सुद्धा दोन प्रमुख कारणे असल्याचे सांगण्यात येत आहे.