शेअर बाजारात निराशा: सेन्सेक्स कोसळला !

0

मुंबई: आज आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी शेअर मार्केटमध्ये निराशाजनक परिस्थिती आहे. कामकाज सुरु होताच सेन्सेक्स २८३.१४ अंकांनी कोसळले. आठवड्याभरापूर्वी ४१ हजारापर्यंत पोहोचलेले सेन्सेक्स ३९९९८ वर आले आहे. आठवड्याभरापूर्वी शेअर बाजारात सेन्सेक्सने ऐतिहासिक उच्चांक गाठले होते. त्यामुळे तेजी दिसून येत होती. मात्र पुन्हा सेन्सेक्स कोसळल्याने मंदीचे वातावरण पसरले आहे.