शेतकर्‍यांच्या खात्यात ११ हजार ९६६ कोटी २१ लाख रुपयांची कर्जमाफी जमा – अजित पवार

0

मुंबई – राज्यातल्या १८ लाख ८९ हजार ५२८ शेतकर्‍यांच्या खात्यात ११ हजार ९६६ कोटी २१ लाख रुपयांची कर्जमाफी जमा करण्यात आली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून १० लाख ४० हजार ९३५ शेतकर्‍यांच्या खात्यात ५ हजार ४०७ कोटी १३ लाख, तर, व्यापारी बँकांच्या माध्यमातून ८ लाख ४८ हजार ५९३ शेतकर्‍यांच्या खात्यात ६ हजार ५५९ कोटी ८० हजार रुपये जमा करण्यात आले आहेत असेही अजित पवार यांनी सांगितले.