Sunday , March 18 2018

शेतकर्‍यांच्या मोर्चामागे नक्षलवाद्यांचा हात!

खासदार पूनम महाजनांचे वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली : भाजपच्या उत्तर-मध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विविध मागण्यांसाठी मंत्रालयाला घेराव घालण्यासाठी नाशिकहून 165 किलोमीटरची पायपीट करत मुंबईतील आझाद मैदानावर आलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनामागे माओवादी हात आहे का? याचा शोध घेतला पाहिजे, असे वादग्रस्त वक्तव्य महाजन यांनी केले. राज्यातील नाडलेल्या शेतकर्‍यांच्या मोर्चाचा संबंध नक्षली चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न महाजन यांनी केल्याने त्यांच्यावर चोहोबाजूनी टीका झाली. विरोधकांनीही महाजन यांच्यावर सडकून टीका केली असून, माफी मागावी अशी मागणी केली आहे.

शहरी नक्षलवाद वाढत आहे..
खासदार पूनम महाजन मुक्ताफळे उधळताना म्हणाल्या, या शेतकर्‍यांच्या हाती लाल झेंडे असून ते कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करत आहेत. आंदोलन शांत पद्धतीने होत आहे. पण यामागे नक्षली आहेत का याचा शोध घेतला पाहिजे. लोकशाहीत आंदोलन केलीच पाहिजे. आतापर्यंत आंदोलने होतच आली. शेतकर्‍यांचे हे आंदोलन अत्यंत शांत पद्धतीने झाले. कर्जमाफी झाली आहे. त्यांनाही ते मान्य आहे. पण त्यांना आणखी काय अपेक्षित आहे हे ऐकून घेऊन त्यावर निश्चितच तोडगा काढला जाईल. सध्या शहरी नक्षलवाद (माओवाद) वाढत आहे. ते चाळीशीला पीएचडी करतात. आपल्या देशात 54 नक्षल प्रभावित जिल्हे आहेत. तिथे ते शिक्षणाच्या विरोधात, साक्षरतेविरोधात काम करतात, असेही त्यांनी नमूद केले.

माफी मागितली पाहिजे
पुनम महाजन यांना शेतकर्‍यांची थट्टा करण्याचा अधिकार नाही. रक्ताळलेल्या शेतकर्‍यांचा त्यांनी अपमान केला आहे. यासाठी पूनम महाजन यांनी माफी मागितली पाहिजे.
– खा. अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

हे देखील वाचा

मी नरेंद्र मोदींची मोठी फॅन : कंगना

मुंबई : अभिनेत्री कंगना राणौत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी राजकीय करियरने प्रभावित झाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *