शेतकऱ्यांप्रमाणे उद्योगपतींचे योगदानही महत्वाचे-मोदी

0

नवी दिल्ली-भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हे सरकार उद्योगपतींच्या बाजूने असल्याचा आरोप केला जातो. मोदींनी अशा टिकाकारांना उत्तर दिले आहे. देशाच्या प्रगतीमध्ये ज्या प्रकारे शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे तसेच उद्योगपतींचेही आहे. त्यामुळे त्यांनाही तितकाच सन्मान मिळायला हवा असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ते सध्या लखनऊच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असून येथे विविध योजनांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.

देशाच्या जडणघडणीत ज्या प्रकारे शेतकरी, बँका, कामगार, मजूर, सरकारी कर्मचारी यांची महत्वाची भुमिका असते तितकीच महत्वाची भुमिका उद्योगपतींचीही असते. उद्योगपतींना चोर-लुटारी असल्याची भाषा वापरली जाते, त्यांच्याबाबत असे बोलणे ही कुठली चांगली पद्धत आहे.