शेतातून पाईप लाईन टाकण्यास शेतकर्‍यांचा विरोध

0

प्रांताधिकार्‍यांच्या उपस्थितीत शेतकर्‍यांनी दिला इशारा

भुसावळ : प्रांताधिकारी कार्यालयात मंगळवारी दुपारी प्रांताधिकारी रामसिंग सूलाणे यांच्या अध्यक्षतेखाली फुलगाव येथील शेतकर्‍यांची बैठक झाली. याप्रसंगी शेतकर्‍यांनी दीपनगर ते ओझरखेडा या मार्गावर टाकण्यात येणारी पाईप लाईन ही पर्यावरण विभागाच्या परवानगी घेतल्यावरच टाकण्याची भूमिका घेत शेतातून ही पाईप लाईन टाकण्याऐवजी रस्त्यावरून टाकावी व शेतातून पाईप लाईन गेल्यास त्यास तीव्र विरोध राहणार असल्याचा इशाराही दिला. ओझरखेडा तलावातील पाणी हे शेतीसाठी असून त्याचा उपयोग हा शेतीसाठीच झाला पाहीजे मात्र यातील पाणी हे महाजनकोला दिले जात असून पर्यावरण विभागाच्या सर्व परवानग्या घेतल्या शिवाय पाईप लाईन टाकू नये, शेतकर्‍यांच्या शेतातून ही पाईप लाईन टाकण्याचा अधिकार्‍यांचा घाट आहे, मात्र महामार्गाच्या बाजूला जागा असतांना त्या जागेतून पाईप लाईन न टाकता शेतकर्‍यांचे नुकसान का केले जाते, याला शेतकर्‍यांना विरोध आहे. पंचायत समितीचे माजी सभापती राजेद्र साहेबराव चौधरी यांनी सांगितले

यांची बैठकीला उपस्थिती
या बैठकीला सिंचन विभागाचे उपअभियंता आर.एस महाजन, हेमंत गिरी, महाजनकोचे कार्यकारी अभियंता डी.एल. निळेकर, शैलेद्र गजरवार यांच्यासह फुलगाव परीसरातील शेतकरी बैठकीला उपस्थित होते.